का कधी कधी अस होत..??? आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत.? आपले मन कोणासाठी इतके झुरते . पण त्याला त्याची अजिबात कदर नसते. . का कधी कधी अस होत.? कि त्या व्यक्तीशिवाय आपण अजिबात राहू शकत नाही . पण ती व्यक्ती आपल्याशिवाय हि खूप खुश असते. ती बोलत तर नाही तीचे डोळे खुप बोलतात, मी फक्त पाहात राहतो पाय आपोआप तीच्याकडे वळतात. सतत कसला तरी वीचार करत असते, काय माहीत तीच्या मनात काय चालते. हासतानाही ती खुप कमी हासु पाहते, पण हासताना तीच्या गालावर खळी पडते. ती उभी असते तीथेच कुठेतरी मी ही उभा राहतो, ती जवळ नसली तरी सहवास तीचा मला जाणवतो. खरच भीती वाटते मला तीच्या जाण्याची, माझ्या कवीतेत पुन्हा काळोख येण्याची. ती आली होती प्रकाश बनुन माझ्या जीवनात, आता जाणवतो सहवास तीचा ह्रदयाच्य स्पंदनात. आता वाटते मला तीनेही माझ्यावर प्रेम करावे, फक्त तीच्यासाठी असलेलं माझे प्रेम एकतर्फी नसावे... फ़क्त तुझाच सागर. तू का बोलत नाही , तुझ्या हृदयाच्या भावना का जाणून घेत , नाहि माझ्या या वेदना... तुला सुद्धा आहे , माझ्या प्रेमाची तहान... तरी सुद्धा बोलत नाही , मनाचे तू कहाण... का वाट बघतेस तू , पहिल्या माझ्या बोलण्याची... का तू प्रयत्न करीत नाहीस , तुझ्या मनाला तोलण्याची.... जिवलग मित्र म्हणून , माझ्या वर हक्क जमाविते बोलत मात्र तेच नाहींस , जे मनात तुझ्या असते... डोळे, हाव - भाव तुझे, सर्वच मला सांगतात ... प्रेम रंग तुझ्या मनात, माझ्याविषयी रंगतात... तशी तर तू आहेस , माझ्या मनाची सखी, तरी सुद्धा नेहमी करतेस , न बोलण्याची चुकी.... माझ्या वरती जीव तुझा, आता सर्वानाच समजतो ... तू मात्र बोलत का नाही, हाच विचार मन करतो ... मी पाहाल केली असती, पण मन माझे आटते... मैत्री पलीकडील या नात्याचा, तुटण्याची भीती वाटते.... नसेल जीवनात प्रेम तुझा, तरी मला चालेल... पण तुझी मैत्री जर नसली , तर जीवन मात्र थांबेल... सकाळची झोप तिच्या हाकेने उडावी, दिनक्रमची सुरुवात तीच्या मंजुळ स्वराने व्हावी, कितीही कामात असलो, तरी दर वेळी फक्त तिचीच आठवण यावी, आणि त्याच आठवणीत सगळी कामे चटकन पार पडावीत, कामात कितीही थकलो, तरी ती सांगेल तिथे तीला जाउन भेटण्याची आस असावी, खरच अशी एकतरी मैत्रीण खास असावी, मनाच्या कोपऱ्यात तीची सुरेख छबी असावी, तीला ठेच लागली असता त्याची जाणीव मला व्हावी, आयुष्यात ती माझ्यापासून दुर जाउ नये, ही भिती असावी, आणि त्याच भिती पोटी... तीच्यासाठी अशा मध्यरात्री मी ही कविता लिहावी... . . . . आणि माझी ही कविता नकळत तिला कुठेतरी वाचावयास मिळावी.. . . . . आणि ही वाचून तिला मग माझी आठवण यावी ... . . . तिला मग माझी आठवण यावी सवय आहे तुझी वाट पहाण्याची. तू येणार नसताना ही सवय आहे तुझ्याशी गप्पा मारण्याची. तू ऐकत नसता नाही सवय आहे. तुला पहात बसण्याची.. तू समोर नसताना ही सवय आहे रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची तो येणार नसताना ही सवय आहे. मन मारून झोपण्याची झोप येणार नसताना ही सवय आहे. अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची. तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसताना ही
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६
बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
